मुंबई–गोवा महामार्गावर मोटारसायकल अपघात; दोघे जखमी

चिपळूण : मुंबई–गोवा महामार्गावर सावर्डे येथे मोटारसायकल अपघात होऊन दोनजण जखमी झाल्याची घटना घडली. हा अपघात मंगळवार, १० मार्च रोजी सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास सावर्डे (ता. चिपळूण) येथील ‘हिवेन हॅप्पी पंजाबी धाबा’ समोर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल पटेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटारसायकल चालक अमेय जगन्नाथ बोल्ये (वय २२, सध्या रा. शिवडी, मुंबई; मूळ रा. ताम्हाणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अमेय बोल्ये हा त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच ४७ सीबी ०७८८) घेऊन मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात होता. सावर्डे येथील ‘हिवेन हॅप्पी पंजाबी धाबा’ समोर आल्यावर त्याने मोटारसायकल हयगयीने व बेदरकारपणे चालवत रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकाला जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह मागे बसलेला प्रवासी जखमी झाला.

या दुर्घटनेत चालक अमेय बोल्ये याला गंभीर दुखापत झाली असून मागे बसलेला यश सहदेव बोल्ये (वय २४, रा. ताम्हाणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यालाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. जखमींवर वालावलकर रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम १२५ (अ), ११५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button