मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच ,आंजणारी पुलाजवळ कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू


मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा येथील आंजणारी पुलाजवळील धोकादायक वळणावर एका मालवाहूबुधवारी सायंकाळी कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मुंबईतील वडाळा येथे राहणारे सुरेंद्रकुमार दुबे (४८ वर्षे, मूळ रा. उत्तर प्रदेश) हे डायपर निर्मितीसाठी लागणारे कच्चे साहित्य घेऊन कंटेनर (क्रमांक: MH 46 BB 2370) मधून गोव्याच्या दिशेने जात होते. २४ मार्च रोजी सायंकाळी ७:१५ च्या सुमारास आंजणारी पुलाजवळील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर अचानक उलटला.

अपघात इतका भीषण होता की, चालक सुरेंद्रकुमार हे ट्रकच्या केबिनमध्येच अडकून पडले होते. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ ‘११२’ आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून लांजा पोलीस स्थानकाचे कर्मचारी विलास जाधव, दिनेश आखाडे आणि सुयोग वाडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. केबिनचे पत्रे कापून मोठ्या शर्थीने चालकाला बाहेर काढण्यात आले. मात्र, लांजा ग्रामीण रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघातामुळे महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, ज्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button