मिशन लक्षवेध विभागीय स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशासाठी 24 मार्चपर्यंत मुदतवाढ


रत्नागिरी, दि, 20 ) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग यांचेव्दारा प्रथम टप्यात मिशन लक्षवेध अंतर्गत कोल्हापूर येथे शूटींग आणि कुस्ती व सांगली येथे रोईंग अशा खेळांचे विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी अर्ज 24 मार्च 2026 पर्यंत विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, रेसकोर्स नाका संभाजी नगर, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा dydkop@gmail.com या ई-मेलवर सादर करावेत असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय उपसंचालक सुहास पाटील यांनी केले आहे.
प्रत्येक खेळासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. यासाठी राज्य स्तरावर प्राविण्य प्राप्त व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच 31 डिसेंबर 2026 रोजी वय 25 वर्ष आतील असणे आवश्यक आहे अशी किमान अर्हता असून मागील दोन वर्षातील कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येईल. क्रीडा कौशल्य व शारीरिक क्षमता चाचण्या घेवून प्रशिक्षणार्थीची निवड अंतिम करण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर स्पोर्टस एक्सलन्स सेंटर मध्ये निवड होणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शक इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यावरील खर्च शासनाद्वारे करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button