मिरकरवाडा जेटी परिसरात सुक्या मासळीवर चोरट्यांचा डोळा, हजारो रुपये किंमतीची मासळी रातोरात गायब


रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात सध्या सुकी मासळी चोरीच्या घटनांनी मच्छीमार महिलांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासळी सुकवण्याचे काम सुरू असून, गेल्या चार दिवसांपासून जेटी परिसरात सुकवण्यासाठी ठेवलेली हजारो रुपये किंमतीची मासळी रातोरात गायब होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
दररोज रात्रीच्या सुमारास घडणार्‍या या चोरीमुळे महिला मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दिवसभर मेहनत करून सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी सकाळी येईपर्यंत नाहीशी होत असल्याने महिलांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. नेमकी ही चोरी कोण करत आहे, चोरटा स्थानिक आहे का बाहेरचा, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button