
मालगुंड दुर्गवाडी येथे तब्बल ६३.११ कोटी रुपये खर्चुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय
गणपतीपुळे जवळील मालगुंड दुर्गवाडी येथे तब्बल ६३.११ कोटी रुपये खर्चुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय आणि रेस्क्यू सेंटर साकारले जात आहे. पालकमंत्री उदय सामंत याच्या संकल्पनेतून आणि वन विभागाच्या पुढाकाराने उभ्या राहणार्या या प्रकल्पामुळे रत्नागिरी सिरहा आता जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे.
या प्राणीसंग्रहालयाची रचना आधुनिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली आहे. येथे पर्यटकांना केवळ भारतीयच नव्हे, तर विदेशी वन्यजीवांचेही दर्शन घडणार आहे. यामध्ये बाघ, बिबट्या, काळा बिबट्या आणि अस्वल यांसारख्या हिस्त्र प्राण्यांसह सांबर, ठिपकेवाले हरीण आणि भारतीय बायसन (गवा) यांच्यासाठी नैसर्गिक अधिवास तयार केला जाईल. तसेच, रंगीबेरंगी भारतीय आणि परदेशी पक्ष्यांसाठी स्वतंत्र एव्हिएरी (पक्षीगृह) हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरेल.
जलचर प्राण्यांची आवड असणार्यासाठी येथे गोड्या पाण्यातील माशांचे भव्य मत्स्यालय उभारले जाणार आहे याशिवाय मगरी आणि कासवांसाठी विशेष नैसर्गिक विभाग तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प केवळ पर्यटनापुरता मर्यादित नसून वन्यजीव संवर्धनासाठीही मैलाचा दगड ठरणार आहे. जखमी जाणि अनाच वन्यजीवांच्या उपचारांसाठी येथे एक सुसज्ज रेस्क्यू सेंटर आणि अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय उभारले जाणार आहे.www.konkantoday.com




