माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत कुवारबाव ग्रामपंचायतचा सन्मान

रत्नागिरी
पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाले आहे माजी वसुंधरा अभियान 5.0 हे एक जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबवण्यात आले यामध्ये राज्यातील 27,895 ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता माझी वसुंधरा अभियान 5.0 सन 2024 /25 मध्ये रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत तिने उत्तम कामगिरी केल्याबद्दल उंचउडी पुरस्कार रक्कम रुपये 50 लाख रुपयाचे पारितोषिक 21 फेब्रुवारी 2026 रोजी डोम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम लाला लजपतराय मार्ग वरळी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते कुवारबाव ग्रामपंचायत च्या प्रशासक सौ.समीक्षा तळेकर आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री विष्णुदास बुंदे ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत माजी सरपंच सचिन यशवंत कोतवडेकर आणि पदाधिकारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएन 136 तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी श्री विष्णुदास बुंदे आणि कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन 136 चे जिल्हा सचिव श्री संजय दळवी आणि तालुकाध्यक्ष श्री देविदास इंगळे पतसंस्था संचालक श्री विनोद गुरव , तालुका सहसचिव उल्हास कोळी आणि मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत अधिकारी संवर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button