महिला बचतगट विक्री केंद्र तथा महिला बचत गट भवनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन


रत्नागिरी, दि. 6 ):- महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहर (आठवडा बाजार) येथे महिला बचतगट विक्री केंद्र तथा महिला बचत गट भवन या नूतन इमारतीचे उद्घाटन उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत उद्या शनिवार 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
यावेळी खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे, विधान परिषद आमदार ॲङ निरंजन डावखरे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड, विधान परिषद आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत. तरी नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर व वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button