
मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलतआवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात अर्ज करा
रत्नागिरी, दि. 23 ) : मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज/ मत्स्य बोटुकली संवर्धक व मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत (लघुदाब / उच्चदाब / अतिउच्चदाब) मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज/ मत्स्य बोटुकली संवर्धक व मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे. याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत (लघुदाब / उच्चदाब / अतिउच्चदाब) मिळणार आहे. यासाठीचा अर्ज सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून येणाऱ्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. याच बरोबर संकेतस्थळावर यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी व शर्ती याबाबत माहिती मिळेल. तरी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालायाकडून करण्यात आले आहे.




