मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन “दर्यावर्दी २०२६” जल्लोषात संपन्न

शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयात दर्यावर्दी २०२६ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दि.१४/३/२०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात दर्यावर्दी २०२६ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध डेज साजरे करण्यात आले. फॉर्मल डे, बॉलिवूड डे, मिस मॅच डे, ट्रेडिशनल डे च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. रांगोळी, चित्रकला इत्यादी स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना वाव दिला. तसेच विविध क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती जोपासली यावेळी प्रमुख अतिथी श्री. विनीत केसरकर आणि श्री.राज तेली, माजी विद्यार्थी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत व स्वागत गीताने झाली. विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष श्री. निलेश मिरजकर यांनी प्रस्तावना आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. वार्षिक अहवाल वाचन कुमार विनायक कांबळे, विद्यार्थी परिषद सचिव यांनी केले. त्यानंतर विविध खेळ व स्पर्धांमधल्या विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात आजी तसेच माजी विद्यार्थ्यांकडून नृत्य, गायन इत्यादी कलाविष्कार सादर करण्यात आले. प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली व मत्स्य विभागातील विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन जे. चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात या महाविद्यालयातून उत्कृष्ठ नागरीक आणि स्वयंरोजगार करणारे पदविकाधारक निर्माण होतील असे अध्यापन आणि व्यक्तीमत्व विकास कार्यक्रम घेतले जातात त्याचा जास्तीत फायदा घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी हंसिका म्हात्रे व श्रुती घडशी या विद्यार्थिनींनी केले. कुमारी श्रुती गावकर हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाप्रसंगी श्री. तौसिफ काझी, श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, श्री. सुशिल कांबळे, सौ. मयुरी डोंगरे, श्री. विलास यादव इत्यादी अधिकारी/ कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी होण्याकरिता मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या सर्व प्राध्यापक, प्राधापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विशेष मेहनत घेतली. रसिक विद्यार्थी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उस्फूर्तपणे कार्यक्रमास दाद दिली.सदर स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button