
मंडणगड येथे दुचारीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील रोवले बौद्धववाडी येथील सचिन लोखंडे (४०) यांचा मंडणगड तालुक्यातील केळशी फाटा दरम्यान दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ८.३० वा. सुमारास घडली.
सचिन हे कामानिमित्त आपल्या मित्राला भेटायला देव्हारे येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर केळशीकडे येत असताना केळशी फाट्याच्या काही अंतरावर वळणावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि सिमेंट पोल तसेच तार्यांच्या कुंपणावर जाऊन दुचाकी धडकली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पं. स. सदस्य संदीप चिखले यांनी बाणकोट पोलिसांकडे संपर्क साधला पोलिसांनी लोखंडे यांना देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सचिन हे मायनिंगमध्ये कार्यरत होते त्यांनी नुकताच डंपरही घेतला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. मोठी मुलगी दहावीला असून मुलगा आठवीमध्ये शिक्षण घेत आहे.
www.konkantoday.com



