
भीषण वणव्याच्या आगीने आंबा बागायतीची ४०० कलमे जळून खाक, वन खात्याचे वणव्याकडे दुर्लक्ष
चिपळूण शहरातील ओझरवाडी, शिवाजीनगर येथील डोंगर परिसरात लागलेल्या भीषण वणव्यामुळे बागायतदार गजानन बाळू रामाने यांच्या आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे ४०० आंब्याची कलमे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
डोंगरात फिरावयास जाणार्या काही लोकांकडून निष्काळजीपणे आग लावली जात असल्याने असे वनवे लागत असल्याचा आरोप रामाने यांनी केला आहे. या प्रकाराकडे वन दर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी सांगितले. बागायतदारांचे मोठे नुकसान होत असून काही वेळा हे प्राणी शिकारही बनतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
ओझरवाडी येथील डोंगरात लागलेल्या वनव्यामुळे रामाने यांच्या आंबा बागेचे मोठे नुकसान झाले असून नवीन लागवडीच्या कलमांचे सुमारे चार लाख रुपये, तर झाडांचे एक लाख रुपयांहून अधिक असे एकूण मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने वनव्यांबाबत गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.www.konkantoday.com




