भारताला मोठा दिलासा! ईराणी ‘चक्रव्यूह’ला भेदून मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज


सौदी अरेबियातून कच्च्या तेलाची वाहतूक करणारे पहिले जहाज सुरक्षितपणे मुंबईमध्ये पोहचले. या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आणि भारतात दाखल झाले त्यामुळे आता इंधन पुठव्याबाबतची चिंता कमी झाली. लायबेरियाचा ध्वज असलेले हे जहाज धोकादायक जलमार्गातून सुरक्षितपणे मुंबई बंदरावर दाखल झाले. भारतीय कॅप्टनच्या नेतृत्वाखाली हे जहाज तणावपूर्ण परिस्थितीमध्ये भारतात आले.शेनलाँग सुएझमॅक्स नावाच्या या जहाजाने १ मार्च रोजी सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरावर कच्चे तेल भरले आणि ३ मार्च रोजी हे जहाज या बंदरावरून निघाले. लॉयड्स लिस्ट इंटेलिजेंस अँड टँकर ट्रॅकर्स या सागरी डेटा फर्म्सच्या मते, ८ मार्च रोजी त्याचे शेवटचे स्थान होर्मुझच्या सामुद्रधुनीत होते. त्यानंतर जहाज रडारवरून गायब झाले होते. धोक्याच्या क्षेत्रातून जाताना शोध टाळण्यासाठी जहाजाने त्याचे ट्रान्सपॉन्डर आणि एआयएस (ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम) बंद केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ९ मार्च रोजी ते ट्रॅकिंग डेटाबेसमध्ये सुरक्षितपणे पुन्हा दिसले.बंदर अधिकाऱ्याने सांगितले की, हे जहाज बुधवारी दुपारी १ वाजता मुंबईत पोहोचले. संध्याकाळी ६:०६ वाजता ते बंदरात उतरले. हे जहाज १,३५३,३५ मेट्रिक टन कच्चे तेल मुंबईत घेऊन आले आहे. ते जवाहर बेटावर उभे करण्यात आले आहे आणि अनलोडिंग ऑपरेशन्स सुरू झाले आहे. जे पूर्ण होण्यासाठी अंदाजे ३६ तास लागतील.

इराणवरून आलेले कच्चे तेल पूर्व मुंबईतील माहूल येथील रिफायनरीजमध्ये पाठवले जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button