भाट्ये येथे PMFME आणि PMMSY योजनांबाबत भव्य जनजागृती शिबिर संपन्न


​रत्नागिरी, दि. ११ )- देशातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ (PMFME) आणि ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा’ (PMMSY) योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने भाट्ये येथे विशेष जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
​बँक ऑफ इंडिया व प्रशासकीय विभागांचा संयुक्त पुढाकार वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) निर्देशानुसार, या दोन्ही योजनांसाठी बँक ऑफ इंडिया ही नोडल बँक म्हणून कार्यरत आहे. बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र रघुनाथ देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, बँक ऑफ इंडिया रत्नागिरी अंचल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० मार्च २०२६ रोजी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे हे शिबिर पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कणसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रबंधक (कृषी विभाग) संकेत सकपाळ, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे आणि प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्टार कृषी विकास केंद्राचे वरिष्ठ प्रबंधक दिनकर कुटे यांनी शिबिराचे प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना योजनांमधील अनुदान, बँक कर्ज सुविधा आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, या शिबिरात PMFME योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
​तसेच, PMFME आणि केसीसी (KCC) फिशरीज अंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन, बँक अधिकारी आणि कृषी विभागाच्या समन्वयातून जागेवरच अडचणी सोडवण्यात आल्या. नवीन इच्छुकांसाठी ‘लीड जनरेशन’ प्रक्रिया राबवून त्यांची नोंदणीही करण्यात आली.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अग्रणी जिल्हा अधिकारी संकेत लेंडे यांनी केले. या शिबिरास विविध बँकांचे जिल्हा समन्वयक, कृषी व मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button