भाटीमिर्‍या, जाकीमिर्‍या आणि सडा मिर्‍या या गावांमध्ये तब्बल ३०० स्ट्रीट लाईट्स गेल्या वर्षभरापासून रात्रंदिवस सुरू, विजेची उधळपट्टी


सरकारच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत मिर्‍या परिसरात राबवण्यात आलेली पथदीप योजना आता वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. भाटीमिर्‍या, जाकीमिर्‍या आणि सडा मिर्‍या या गावांमध्ये तब्बल ३०० स्ट्रीट लाईट्स गेल्या वर्षभरापासून रात्रंदिवस सुरू असल्याने कोट्यवधी रुपयांची वीज वाया जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या प्रकल्पांतर्गत भूमिगत वीजवाहिन्या आणि पथदीप बसविण्याचे काम ’लीना पॉवरट्रेक इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडे सोप्विण्यात आले होते. केंद्र सुमारे ९७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची मुदत एप्रिल २०२१ पर्यंत होती. मात्र सडा मिच्या बौद्धवाडीतील काम अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे.
प्रकल्पाचा देखभाल कालावधी संपल्यानंतर ही यंत्रणा महावितरणकडे वर्ग करण्यात आली. सुरुवातीला दिवे चालू-बंद करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आला होता; मात्र पगार न मिळाल्याने त्याने काम सोडले. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून दिवे २४ तास सुरूच असल्याचे चित्र आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button