
भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी अभिजीत गुरव
राजापूर: भाजपच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रशांत यादव यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये राजापूर पंचायत समिती सदस्य अभिजीत गुरव यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे तालुक्यात एकमेव भाजपचे पंचायत समिती सदस्य अभिजीत गुरव यांची जिल्हा कमिटीवर निवड झाल्यामुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमधून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, राजापूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना नवीन पदे देण्यात आली आहेत.
जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर सुतार आणि सौ. शीतल पटेल यांची निवड झाली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे तालुका भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.




