भरधाव कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे पुन्हा अपघात घडला आहे. भरधाव स्विफ्ट डिझायर कारने दुचाकीला ठोकर देऊन झालेल्या अपघातात एक महिला आणि तिचा मुलगा जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास भरणे काळकाई मंदिरा जवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा दुचाकींचा अपघात झाला. या अपघाताला २४ तास उलटण्यापूर्वीच पुन्हा भरणे नाका येथे त्याच ठिकाणी अपघात घडला आहे. महाडकडून खेडच्या दिशेने भरधाव वेगात येणारी स्विफ्ट डिझायर गाडीवरील (क्र. एमएच-०६-बीइ-६८५४) चालकाचे गाडीच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने ॲक्टिव्हा गाडीला मागाहून थोर देऊन कार डिव्हायडरवर चढली. या अपघातात दुचाकीवरील एक महिला आणि तिचा मुलग जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना कळंबणी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button