
भरणे जगबुडी नदीपात्रातील पाणीपातळीत घट
बारमाही वाहणार्या भरणे येथील जगबुडी नदीपात्रातील पाणी पातळीत घट झाली आहे. रणरणत्या उन्हामुळे पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत नदीपात्रात झाडी-झुडपे निदर्शनास येत असून ती तोडून नदीपात्र मोकळे करण्याची तसदी प्रशासन घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भरणे येथील नदीपात्रातील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नसला तरी अन्य कारणासाठी या पाण्याचा वापर केला जातो. मात्र सद्यस्थितीत नदीपात्र कोरडे बनत चालले आहे. वर्षानुवर्षे नदीपात्रात वाढलेली झाडी-झुडपे तोडण्याची तसदी घेतली जात नसल्यामुळे पाणीसाठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. भरणेतील जगबुडी नदीपात्र ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याने ग्रामपंचायतीने झाडी-झुडपे तोडण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बाब गांभीयनि घेवून नदीपात्र मोकळे करण्याच्यादृष्टीने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.www.konkantoday.com




