बॅडमिंटन स्पर्धेत सांगली व सातारा जिल्ह्याचे वर्चस्व

चिपळूण : डेरवण येथील एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात सुरू असलेल्या “डेरवण यूथ गेम्स २०२६”मधील बॅडमिंटन स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे वर्चस्व राखताना तेथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या श्लोक भोसले याने मुलांच्या १३ व १५ वयोगटाखालील दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके पटकावली, तर सांगली जिल्ह्याचे वर्चस्व प्रस्थापित करताना तेथील एल.पी. पाटील विद्यालयाची एम. एस. तरसे हिने मुलींच्या १३ व १५ वयोगटाखालील दोन्ही गटांमध्ये सुवर्णपद‌के पटकावली.
साताऱ्याच्या सौरभ चव्हाण बॅडमिंटन अकॅडमीची गौरी प्रमोद गोंदकर हिने ११ वर्षीय मुलींच्या गटात सुवर्ण व १३ वर्षांखालील मुलीच्या गटात कांस्यपदक मिळवले. तर सांगलीच्या आर. बी. पी. बॅडमिंटन अकॅडमीचा समर्थ सावंत याने १५ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्य, तर १७ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळविले. मुंबईची अनुश्री मोडलिंबकर हिने मुलींच्या १३ व १५ वयोगटात रौप्यपदक पटकावले.

बॅडमिंटन स्पर्धेच्या ११ वर्षांखालील मुलींच्या गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या एफ. एस. क्लबची निरजा राजेश पवार हिने रौप्य व याच क्लबच्या स्वरा योगेश कोळी हिने कांस्यपदक मिळविले. मुलांच्या ११ वर्षीय गटामध्ये सातारा जिल्ह्यातील उंब्रज (कराड) येथील एस.सी.बी.ए.च्या रियांश अभिजित राउत याने सुवर्ण, तर सिंधुदुर्गच्या आर.पी. बी बॅडमिंटन अकॅडमीच्या कुणाल किशोर जेजुरकर याने रौप्य आणि अभिनव प्रशालेच्या दुर्वांक प्रथमेश सावंत याने कांस्यपदक मिळविले. मुलांच्या १३ वर्षांखालील गटामध्ये साताऱ्याच्या रॉयल इंग्लिश स्कूलचा विराज आर्जुगडे याने रौप्य तर सिंधुदुर्गच्या खेलो इंडिया सेंटर स्कूलच्या ऋषांक कुलकर्णी याने कांस्यपदक मिळविले. मुलींच्या १५ वर्षांखालील गटात साताऱ्याच्या सौरभ चव्हाण अकॅडमीची मीरा तोडकर हिने कांस्यपदक पटकावले. मुलांच्या १५ वर्षांखालील गटामध्ये साताऱ्याच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या आराध्य पवार याने रौप्यपदक मिळविले. मुलांच्या १७ वर्षांखालील गटामध्ये सिंधुदुर्गच्या वेतोरा हायस्कूलच्या साईराज सामंत याने सुवर्ण तर जी.व्हि. पब्लिक स्कूलच्या वेदांत पोयेकर याने कांस्यपदक पटकावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button