
प्रादेशिक मनोरुग्णालयाचा होणारं कायापालट
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय शहरातील महाविद्यालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा चेहरामोहरा शासनाच्या माध्यमातून बदलण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या रुग्णालयातील इमारतींच्या नूतनीकरणाच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. १३४५.३८ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी मिळाल्यानंतर सध्या येथे युद्धपातळीवर काम सुरू आहे.
या प्रकल्पामुळे महत्त्वाकांक्षी मनोरुग्णालयातील जुन्या वॉर्डाना आता नवे रूप प्राप्त होणार आहे. रुग्णालयाच्या आवारातील एकूण २५ वॉर्ड इमारतींचे बळकटीकरण आणि नूतनीकरण करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. केवळ इमारतीच नव्हे, तर रुग्णांच्या आणि कर्मचार्यांच्या सोयीसाठी आवारातील ९०० मीटर लांबीच्या रस्त्यांच्या नूतनीकरणही या कामात समाविष्ट असून त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ४५० मीटर लांबीच्या सुरक्षा रक्षक भिंतीचे बळकटीकरण आणि नूतनीकरणाचे कामही वेगाने सुरु करण्यात आले आहे.
रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या या विकासकामांमुळे रुग्णांना अधिक चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून या कामाच्या गुणवत्तेवर आणि वेळेवर विशेष लक्ष दिले जात आहे. लवकरच हे मनोरुग्णालय आधुनिक स्वरूपात पाहायला मिळणार आहे.
www.konkantoday.com




