
प्रकाशनाचे प्रवाह बदलत राहणार ते अपरिहार्य आणि आवश्यक ही आहे .नव्या युगातील डिजिटल माध्यमाचा प्रभावी उपयोग करत बदलत्या प्रवाहांचे स्वागत करण्यासाठी सज्जता हवी. _:दीपक पटवर्धन
नाशिक येथील विश्व मराठी संमेलनात प्रकाशनातील बदलते प्रवाह ह्या परिसंवादात रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालया चे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी साहित्यात बदल अपरिहार्य आहे .प्रकाशन क्षेत्राचे स्वरूप बदलले आहे. प्रकाशनांमध्ये विविध विषयांवर ग्रंथ येत आहेत. ग्रामीण साहित्य ही मोठ्या प्रमाणावर येत असून भारतीय संस्कृती, संरक्षण क्षेत्रातील डावपेच, पौराणिक संदर्भातून नव्या मांडणीची प्रकाशने, अनुवादित पुस्तके,आदी नवी नवी प्रकाशने आज प्रकाशित होत आहेत. या युगात युवा वर्गाला आकर्षित करायचं असेल तर डिजिटल माध्यम प्रभावी पणे प्रकाशन क्षेत्रांत वापरली गेली पाहिजेत अस मत दीपक पटवर्धन यांनी नोंदवत महाराष्ट्रात लहान मोठ्या शहरात ग्रंथ विक्री करणारी दुकाने उघडली पाहिजेत की ज्यामुळे प्रकाशांना त्यांचे ग्राहक सहज पणे उपलब्ध होतील दुर्दैवाने मोठ्या शहरांचा अपवाद वगळता. क्वचितच शहरात दुकाने आहेत ती सर्वत्र उघडली पाहिजेत,यात बदल झाला पाहिजे. अन्य प्रश्नांना उत्तर देताना रत्नागिरी वाचनालयाच्या द्विशतकी दैदीप्यमान प्रदीर्घ कारकिर्दीचा आलेख पटवर्धन यांनी मांडला. या परीसंवादाचे संयोजन सौ शुभदा फडणवीस यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत केले. या परिसंवादात सुषमा दातार, लतिका भानुशाली, प्रकाश पारखी यांनीही आपले अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले.
प्रकाशनात बदल स्वाभाविक आहेत जगाच्या वेगवान प्रगतीत घडणाऱ्या गोष्टी ,बदललेली कार्यपद्धती ,तंत्रज्ञानात झालेले बदल हे जाणवत आहेत हे बदल असेच सुरू राहणार आपण वाचकाना वाचन संस्कृती बरोबर सलग्न ठेवण्यासाठी प्रामुख्याने युवा पिढीला प्रेरणा मिळेल अश्या व्यवस्था निर्माण करूया असे प्रतिपादन संयोजिका शुभदा फडणवीस यांनी केले. या परिसंवादा साठी रावसाहेब थोरात सभागृहात मोठ्या संख्येने श्रोत्यांनी या परिसंवादाचा आस्वाद घेतला.




