पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत निर्णय जलतरण तलाव, व्यायामशाळा, तायक्वांदो, बॅडमिंटन, बास्केटबॉल कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल स्वत: चालवणार

रत्नागिरी, दि. 22 ) : जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सुरु असलेल्या सुविधा जलतरण तलाव, व्यायामशाळा, तायक्वांदो हॉल, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल स्वत: चालवेल, दुसऱ्या कोणत्याही बाह्य यंत्रणेला देणार नाही, असा धोरणात्मक निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत काल घेण्यात आला.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते.


जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करुन सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, फ्लोरींग करिता 1 कोटी 98 लाख रुपये ची निविदा स्थानिक स्तरावर प्रसिध्द करावी. त्यानुसार कामकाम करुन घ्यावे. उत्तम प्रशिक्षक ठेवून त्यांना चांगल्या पगारावर नेमणूक करावी आणि जिल्हा क्रीडा संकुलाने सर्व स्वत: चालवावे. व्यावसायिक बाह्य यंत्रणेला चालविण्यास देऊ नये. सेवाशुल्क, अग्नीसेवा शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाची निविदा पुढील आठवड्यामध्ये मार्गी लावण्याची सूचना देऊन पालकमंत्री म्हणाले, महावितरणने सिंगल फेज वरुन थ्री फेज करण्याची मोहीम हाती घ्यावी. एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणे तसेच अनावश्यक उभे असणारे होर्डींग काढावेत. स्थानिकांसाठी त्याबाबत धोरण ठरविले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या ठिकाणीच विशेषतः डाजिटल होर्डींग उभी करण्याबाबत नगरपरिषदेने नियोजन करावे.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय, ध्यान केंद्र इमारत, अल्पसंख्यांक वसतिगृह इमारत, एनसीसी इमारत, रत्नागिरी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बैठक झाली.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button