पालकमंत्री उदय सामंत यांनी केली तीन विषयांवरून नगर परिषद प्रशासनाची कानउघाडणी


रत्नागिरी नगर परिषदेकडून मंजूर करण्यात आलेल्या तीन विषयांवरून पालकमंत्री ना. उदय सामंत यानी प्रशासनाची चांगलीच कान उघाडणी केली. प्रशासकीय काळातील वादग्रस्त विषयांचे खापर नगरसेवकांवर न फोडता पालिका प्रशासनाने आपल्या स्तरावर निकाली काढावा, अशी सक्त ताकीद अधिकार्‍यांना दिली आहे. त्यामुळे सोमवारी होणार्‍या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत नगरसेवक आणि प्रशासनाची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रत्नागिरी पालिकेत गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेले विषय स्थगित ठेवण्यात आले होते. ही कामे पूर्ण झाली असून, आता त्याना मंजुरी देण्यात येणार होती. पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी होणार आहे. या सभेमध्ये स्थगित ठेवलेले हे विषय पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबविण्यासाठी ३०८ नुसर हे विषय रद्द करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी याबाबत पालिका प्रशासनाचे चांगलेच कान टोचले. गेली तीन वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्या काळातील हे विषय आहेत. ते तुम्ही सोडवायचे आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button