
पत्रकार दिपक भागवत मारहाण प्रकरणी १५ जणांवर गुन्हा
चिपळूणमध्ये एका पत्रकाराला बुधवारी दुपारी १२ वाजता शहरातील बहादूरशेखनाका परिसरात बेदम मारहाण करीत त्याचे ओळखपत्र व अन्य साहित्याची चोरी. करण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका पतसंस्थेच्या १५ कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संस्थेच्याविरोधात उपोषण करणार्या दोघांवरही जातीवाचक शिवीगाळ, चैन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका पतसंस्थेच्या गैरकारभाराविरोधात रुपेश सुरेश पवार (खेड) हे उपोषणाला बसत असताना त्याचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार दिपक भागवत हे कॅमेरामन रुपेश साळुंखे यांच्यासह बहादूरशेखनाका येथे गेले होते. यावेळी पतसंस्थेच्या १० ते १५ लोकानी हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच त्यांच्या बॅगमधील ओळखपत्र व अन्य साहित्य चोरून नेल्याची तक्रार भागवत यांनी केली असून त्यानुसार गुन्हा -दाखल करण्यात आला आहे.
तसेच अभिषेक चंद्रकांत मोहिते यानेही तक्रार दिली असून त्यात त्याने बुधवारी सकाळी ११.३० वाजता ओळखपत्रासह आपण सरबत साहित्याची केली आणण्यासाठी चोरी गेलो असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ तीन ते चार लोक बॅनर लावताना दिसले. त्याबद्दल मी त्यांना विचारले असता त्यातील रुपेश पवार, रवींद्र पवार यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच आपली चैनही चोरीला गेल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले करीत आहेत.
www.konkantoday.com




