
नागरी संरक्षण दलाच्या नुतनीकरण कार्यालयाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
रत्नागिरी, दि. 6 ):- गृह विभाग (विशेष) विभागाच्या नागरी संरक्षण दलाच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्या शनिवार 7 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.
यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, अधिक्षक अभियंता सा.बां.विभाग मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग अमोल ओटवणेकर, उप अभियंता सा.बां.वि. जनक धोत्रेकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संबंधितांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल व उपनियंत्रक नागरी संरक्षण दल ले. कर्नल प्रशांत चतुर (नि.) यांनी केले आहे.




