
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर सेक्टर ८ परिसरात भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ कारने ३५ वर्षीय महिलेला दिली धडक
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर सेक्टर ८ परिसरात भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ कारने ३५ वर्षीय महिलेला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बेलापूरमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक दिल्यानंतर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहा वाहनांनाही जोरदार धडक दिली. संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय विक्रम कांबळे हा स्कॉर्पिओ कार चालवत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि फुटपाथवर चालत असलेल्या मोहिनी शिंदे या महिलेला धडक बसली. त्यानंतर कारने एक दुचाकी, रिक्षा आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारना धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी विक्रम कांबळे आणि त्याचा मित्र आकाश कांबळे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे




