
नगरपंचायत दापोली अत्याधुनिक सक्शन युनिट लोकार्पण सोहळा
दापोलीः- स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत दापोली नगरपंचायतीला आधुनिक सक्शन युनिट या अत्याधुनिक वाहनाचा लोकार्पण सोहळा समाजसेविका सौ. श्रेयाताई कदम यांच्या हस्ते संपन्न झाला.
दापोली शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्याच्या दिशेने हे वाहन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यामुळे मोठी मदत होणार असून, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यास याचा निश्चितच हातभार लागेल. स्वच्छतेचा संकल्प केवळ शासनाचा नसून प्रत्येक नागरिकांचा आहे. शासनाच्या योजना आणि नागरिकांचा सहभाग यांची सांगड घातल्यासच स्वच्छ दापोली, सुंदर दापोली हे स्वप्न साकार होईल असा ठाम विश्वास यावेळी श्रेयाताई कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष सौ. कृपा घाग, महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख रोहिणी दळवी, तालुकाप्रमुख दिप्ती निखार्गे, ममता शिंदे, माजी नगराध्यक्ष रसिका पेठकर, परवीन शेख, माजी नगरसेविका शबनम मुकादम, नगरसेविका जया साळवी, अश्विनी लांजेकर, रिया सावंत, प्रिती शिर्के, शिवानी खानविलकर, किर्ता परांजपे यांच्यासह दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक कर्मचारी उपस्थित होते.
फोटो डिपी 26-02 दापोली नगरपंचायतीच्या अत्याधुनिक सक्शन युनिटचे लोकार्पण करताना सौ. श्रेयाताई कदम व अन्य मान्यवर




