नंदकुमार मोहिते यांचे कार्य पुढे नेण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करा- अशोक वालम


समाजनेते स्व. नंदकुमार मोहिते यांनी आपल्या आयुष्यात निस्वार्थी आणि निर्भीडपणे समाजसेवा केली. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय असून, ते पुढे चालू ठेवण्यासाठी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय लोकांची समिती स्थापन करावी. या समितीच्या माध्यमातून मोहिते यांच्या विचारांचा प्रसार करत त्यांचे कार्य निरंतर सुरू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांनी केले.
शिवार आंबेरे येथील विद्या संकुल परिसरात आयोजित नंदकुमार मोहिते यांच्या प्रथम स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विविध मान्यवरांनी मोहिते यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. ओबीसी मूळनिवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, चंदनाप्रमाण स्वतःचा देह झिजवून कष्टातून वसंत फुलविणारे नंदकुमार मोहिते हे लाखात एक नेतृत्व होते. सामाजिक किंवा राजकीय प्रलोभनांना बळी न पडता त्यांनी समाजाची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या विचारांचे बीज समाजा पेरणे ही आजची गरज आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button