दुबईत अडकलेल्या भारतीयांना घेऊन पहिले विमान मुंबईत दाखल;

मुंबई ०३:- इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने देखील दुबईवर जोरदार हल्ला केला आहे. मध्यपूर्व भागामध्ये युद्धाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्रे हल्ले केले जात आहेत. यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या झाल्यामुळे इराण आक्रमक झाला आहे. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हजारो भारतीय हे मध्यपूर्व आखाती देशांमध्ये अडकले आहेत. यामध्ये दुबईतील पहिले विमान हे भारतीयांना घेऊन सुरक्षित मुंबईमध्ये दाखल झाले आहे.इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे. तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानतळांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. तसेच हजारो भारतीय पर्यटक हे या देशांमध्ये अडकले होते. या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत होते. अखेर प्रवाशांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये दाखल झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button