दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी खा. राणेंचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र


कोकणातील अर्थसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी ठोस मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सद्धिस्तर पत्र पाठवून स्थानिक नागरिकांच्या अडचणी मांडल्या आहेत. नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.  यासंदर्भात त्यांनी सविस्तर पत्र पाठवून स्थानिक नागरिकांच्या अडचणी मांडल्या आहेत.
सन १९९८ पासून सुरु असलेली ही पॅसेंजर सेवा कोविड काळात बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आजतागायत ही गाडी दादर येथून पुन्हा सुरु करण्यात आलेली नाहीं. सध्या काही गाड्या दिवा स्थानकातून रत्नागिरीकडे सोडल्या जात असल्या तरी पश्चिम उपनगरात राहणार्‍या कोकणवासीयांसाठी हा पर्याय अत्यंत गैरसोयीचा ठरत आहे.
पूर्वीप्रमाणेच दादर येथून ही गाडी सुरू व्हावी, अशी सर्वसामान्याची अपेक्षा होती. परंतु दादर-रत्नागिरी पॅसेंजर कांवन्धी बंद करण्यात आल्याचे समोर येत असून, त्याऐवजी दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या लांब पल्ल्याच्या गाडीला प्राधान्य देण्यात आले आहे. ही पॅसेंजर ट्रेन् विशेषतः गरीब, कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांसाठी स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचे प्रमुख साधन होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button