
…तर प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार, कॉंग्रेस आक्रमक भूमिकेत
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या अहवालात वाशिष्ठी नदी प्रदुषित असल्याचे म्हटले आहे. तर येथील कार्यालय तसा अहवाल आपल्याकडे नसल्याचे सांगत आहे. विशेष म्हणजे नागरिकांना पाणीपुरवठा करणार्या नगरपरिषदेकडे पाणी शुद्ध असल्याचा अहवाल आहे. त्यामुळे ’पाणी शुद्ध की अशुद्ध’ हेच ठरत नसून या गोंधळात कॉंग्रेस मात्र आक्रमक भूमिकेत आहे. त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक देत याचा जाब विचारत नागरिकांना काही त्रास झाला तर तुम्हाला जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाशिष्ठी नदी प्रदूषित असल्याचा मुद्दा गाजत आहे. मात्र गेल्या १५ वर्षांचा विचार करता ती शुद्ध कधी होती याचा मात्र कोणीही विचार करताना दिसत नाही. नदीत सोडलेले सांडपाणी, टाकले जाणारे मांस, मच्छीचे टाकाऊ अवशेष अशा अनेक प्रकारांमुळे रात्रीच्यावेळी नदीतून उग्र वास येतो. अनेकदा तिचे पाणी हिरवे दिसते. यात कमी की काय म्हणून कचरा आहेच. त्यामुळे
नदी प्रदूषित आहे असा अहवाल येण्यात त्यावर उपाययोजना काहीही नवल नसून याला जबाबदार कोण, काय यावर जास्त विचार होण्याची गरज आहे.www.konkantoday.com




