डोळ्यांचे पारणे फेडणारा रत्नागिरीच्या ग्रामदेवतेचा पालखी भेटीचा सोहळा

रत्नागिरी : संपूर्ण जिल्ह्यात शिमगोत्सवाचा ज्वर शिगेला पोचला असून, काल (२ मार्च) समस्त रत्नागिरीकरांचे विशेष आकर्षण असलेली श्री देव भैरी आणि जाकिमिऱ्या-भाटीमिऱ्या येथील नवलाई पावणाई पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी काल सायंकाळपासूनच रत्नागिरीकरांनी भैरी मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. हजारोंच्या भक्तांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा हा पालखी भेटीचा सोहळा पार पडला. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचे मनोभावे दर्शन घेतले.

सध्या संपूर्ण जिल्ह्यासह कोकणात शिमगोत्सवाची धूम असून, चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. प्रत्येक गावात रूढी, परंपरेनुसार शिमगा उत्सव साजरा केला जात आहे. ढोल ताशांच्या गजरात विविध ठिकाणांहून पालख्या भेटीसाठी बाहेर पडत आहेत. रत्नागिरीच्या ग्रामदेवतेच्या भेटीसाठी आसपासच्या गावातील पालख्या श्री देवभैरी मंदिरात दाखल झाल्या होत्या.
दरम्यान, श्री देव भैरी आणि नवलाई पावणाई हा बंधू भगिनींचा पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी यु ट्यूबद्वारे लाईव्ह पाहण्याची संधी गेली काही वर्षे उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे या माध्यमातून लाखो भक्तांनी या सुविधेचा लाभ घेत हा सोहळा विविध ठिकाणांहून प्रत्यक्ष पाहिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button