
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत दापोली शहरात महास्वच्छता अभियान


दापोली : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दापोली शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले . धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रतिष्ठानच्या सौजन्याने १ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता दापोली शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.


ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पा धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या अभियानात दापोलीतील पंचायत समिती कार्यालय परिसर, प्रांत कार्यालय परिसर, दापोली तहसीलदार कार्यालय परिसर आणि भूमी अभिलेख कार्यालय परिसर स्वच्छता करण्यात आली.
या कार्यक्रमात जवळपास ४ टन कचरा जमा करण्यात आला. या स्वच्छता अभियान कार्यक्रमात दापोली तालुक्यातील श्रीसमर्थ बैठक मधील सर्व श्रीसदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच दापोलीतील अनेक नागरिक व मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.




