
डॉ. खान कंपनीसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
लोटे वसाहतीमधील डॉ. खान कंपनीत झालेल्या स्फोटामुळे ९ कामगार जखमी होण्याची घटना घडलेली असतानाच आता कंपनीवर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वानंद बाबुराव खोंडे वय ३२ वर्ष रा. लोटे धापसेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंपनीच्या इथाइल सिलिकेट केमिकल तयार होणाऱ्या प्लांट मध्ये काम करत असताना अचानक स्फोट होऊन त्या ठिकाणी काम करत असलेले फिर्यादी व कामगार याना प्लांटच्या वरील बाजूस असलेले सिमेंट पत्र्याचे छत खाली पडून रियाकटर मधील गरम व शरीरास घातक असलेले केमिकल उडाल्याने फिर्यादी आणि कामगार जखमी झाले आहेत.
यातील कंपनीचे मालक डॉ. विखार एहमद खान, कंपनी मॅनेजर सलीम अब्दुल वासेविजापूरे, प्लांट इंचार्ज प्रीतम बाळकृष्ण पोळेकर तसेच कंपनी व्यवस्थापनाने यातील फिर्यादी आणि कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही प्रकारची साधन सामुग्री हेल्मेट, गमबूट, सेप्टिड्रेस, गॉगल, हॅन्ड ग्लोज पुरवली नसल्याने वरील कंपनी व्यवस्थापनावरील अधिकाऱ्यांवर भारतीय न्यायसहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५ ( अ ) १२५ ( ब ) २८६,२८७,२८८, ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




