जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे शुक्रवार, शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलन


रत्नागिरी, दि. 11 ) : जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे 30 वे वार्षिक स्नेहसंमेलन दि. 13 व 14 मार्च रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी या स्नेहसंमेलनास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
शुक्रवार दि. 14 मार्च रोजही सकाळी 10 वाजता फनीगेम्स आणि 10.30 वाजता पाककला उद्घाटन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रानडे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 12.30 वाजता स्नेहसंमेलन उद्धाटन, स्मरणिका प्रकाशन व विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि महसूल, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या होणार आहे.

यावेळी लोकसभा सदस्य खासदार नारायण राणे, सुनिल तटकरे, विधानसभा सदस्य आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, किरण (भैया) सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद सर्व सदस्य यांची उपस्थिती असणार आहे.

सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजता या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. 14 मार्च रोजी सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायण महापुजा, आरती व भजन, सकाळी 11 ते दु.1 वाजता जिल्हा परिषद मुख्यालय स्पर्धांचा बक्षिस वितरण कार्यक्रम, दुपारी 1.30 वाजता भोजन, सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजता जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचा मराठी व हिंदी गीतांचा सदाबहार ऑर्केस्ट्रा असे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button