
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ॲड.सुयोग कांबळे यांचे आंबडवे येथे अभिवादन
पाली : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे यांनी नुकतीच मंडणगड तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ आंबडवे या गावी जाऊन त्यांच्या स्मारकाला सदिच्छा भेट देऊन अभिवादन केले. या दौऱ्यात त्यांनी तेथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या वाचनालयाची पाहणी केली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, मंडणगड तालुका शिवसेना प्रमुख व जि.प. सदस्य प्रताप घोसाळकर, मंडणगड पं.स. सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, गटनेते पं.स. सदस्य अनिल रटाटे, पं.स. सदस्या दीप्ती घडशी, विभागप्रमुख ईरफान बुरोंडकर, विभागप्रमुख संजय शेडगे, उपविभागप्रमुख राम जगताप, शहरप्रमुख गटनेता विनोद जाधव, उपशहरप्रमुख नीलेश गोवळे, नगरसेविका प्रमिला किंजळे,
सचिव सिद्धेश देशपांडे, सरपंच दीपिका जाखल, दीपक जाखल उपस्थित होते.



