जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२६-२७ उत्साहात संपन्न

प्रतीक पुजारी आणि राधिका पेडणेकर ठरले मानकरी

रत्नागिरी : शिव योगा क्लासेस व प्रायोजक राजेश सोहनी अँड कॉ. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिस्टर योगी अँड मिस योगिनी’ ही जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२६-२७ नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आगाशे एम्पायरचे मालक आणि स्वतः योग शिक्षक असलेले अनंत मुकुंद आगाशे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंचावर स्पर्धेचे प्रायोजक राजेश रमेश सोहनी, शिव योग क्लासेसचे प्रमुख दुर्वांकूर अविनाश चाळके, राष्ट्रीय पंच रणवीर सावंत, डॉ. गौरव आंब्रे, रा. भा. शिर्के प्रशाला गुरुकुलचे प्रमुख व योग शिक्षक किरण सनगरे तसेच योग प्रशिक्षक अशोक कुमठेकर, किरण संगरे, सौ. श्रद्धा जोशी, अपूर्वा मुसळे आणि डॉ. सौ. कविता फासके यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे ६० ते ७० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या योगाभ्यासाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
ही स्पर्धा प्रामुख्याने १० वर्षांखालील, ११ ते १४ वर्षे आणि १५ ते १८ वर्षे अशा वयोगटांत पार पडली. स्पर्धेच्या निकालात १० वर्षांखालील मुलींच्या गटात ईशा आशुतोष गुर्जर (प्रथम), वीरा अमेय गांधी (द्वितीय) व अवनी जानकर (तृतीय) यांनी यश मिळवले.
मुलांच्या गटात आरुष अमोल पाटील (प्रथम), शौर्य स्वराज मगदूम (द्वितीय) व दक्ष महेंद्रसिंग राणा (तृतीय) विजयी ठरले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात राधिका मंदार पेडणेकर (प्रथम), दिया दिनकर सावर्डेकर (द्वितीय) व दुर्वा अमोल साळवी (तृतीय) यांनी बाजी मारली, तर मुलांच्या गटात आयुष विक्रांत पाटील (प्रथम), स्वरूप मनोज खेराडे (द्वितीय) व सोहम विजय बंडबे (तृतीय) यांनी क्रमांक पटकावले. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात सलोनी अमोल शिर्के (प्रथम) व श्रेया सविता बळीराम तारे (द्वितीय) यांनी यश संपादन केले, तर मुलांच्या गटात प्रतिक पुरंदर पुजारी (प्रथम), रत्नेश हितेश आडिवरेकर (द्वितीय) व स्पंदन गौरव धामणे (तृतीय) यांनी यश मिळवले. या सर्व गटांतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांमध्ये मिस्टर योगी आणि मिस योगिनी या मुख्य पुरस्कारासाठी चुरस झाली. यात प्रतीक पुरंदर पुजारी याने मिस्टर योगी’ तर राधिका मंदार पेडणेकर हिने मिस. योगिनी’ हा मानाचा किताब पटकावला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक तथा श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष महेश सामंत उपस्थित होते. गेल्या ३० वर्षांपासून ना. सामंत यांच्यासोबत सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महेश सामंत यांनी उदय सामंत प्रतिष्ठानमार्फत राबवल्या जाणाऱ्या आरोग्य शिबिरे, रांगोळी प्रदर्शन आणि पुस्तक प्रकाशन अशा विविध उपक्रमांची माहिती देत सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. सर्व वयोगटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button