
जिल्हाधिकार, जिल्हा प्रदुषण अधिकारी, एम आय डी सी महाराष्ट्र सी ई ओ यांना कायम निलंबीत करावे – अशोकराव जाधव यांची निवेदनाद्वारे मागणी
लक्ष्मी ऑर्गनिक्स विरोधी आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
खेड : लोटे एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी जी पीफास नावाचे अत्यंत विषारी घातकी केमिकल बनवत आहे. ते सर्व दोनशे की मी हवाई अंतरात प्रदुषण निर्माण करून सर्व प्राणी मात्रांच्या जिवाला हानिकारक आहे ही कंपनी बंद करावी म्हणून २२ डिसेंबर रोनी रत्नागिरी जिल्हा अधिकारी श्री. जिंदल यांना निवेदन देवूनही त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा अधिकारी यांना २० जानेवारी पर्यंत कंपनी बंद न केल्यास दिनांक २१ जानेवारी २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलनाचे इशारा प्रत्र देवूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. म्हणून इशारा पत्रा प्रमणे कोकण नागरी संघर्ष समितीचे अशोकराव जाधव आणि राजेंद्र आंब्रे हे दिनांक २१ जानेवारी २०२६ पासुन बेमुदत धरणे आंदोलन लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या गेट समोर बसुन करत आहेत. त्या आंदोलनाला ५१ (एक्कावन ) दिवस झाले आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल या आंदोलनाची घेतली गेली नाही.
लक्ष्मी ऑरर्गॅनिक कंपनी जी इटली या देशात घातकी मानवी जिवनास मारक म्हणून तिला सिल ठोकले तिच कंपनी गोयंका ग्रुप आणि साथिदार यानी भंगारातील साहित्यासह विकत घेऊन ज्या पी फास ला जगभरात बंदी आहे ते पी फास लोटे एम आय डी सी मध्ये बनवून येत्या पाच वर्षात किमान दहा लाख लोक बाधित होतील अशी तज्ञांची खात्री आहे त्याचा वस्तूनिष्ठ पुरावा याच कंपनी द्वारा इटली मध्ये याच पी फास केमिकल मुळे साडे तिन लाख लोक बाधित झाले. चार हजार लोक मृत्यू मुखी पडले ऐवढा मोठा पुरावा आहे. म्हणूनच ही कंपनी बंद व्हावी म्हणून कोकण नागरी संघर्ष समिती च्या वतीने धरणे आंदोलन चालू आहे. तरीही जिल्हातील प्रशासकीय प्रमुख जिल्हा अधिकारी श्री. जिंदल, प्रदुषण जिल्हा अधिकारी श्री. कुलकर्णी तसेच महाराष्ट्र एम आय डी सी चे सी ई ओ या तिघानांही कोणतीच दखल न घेतले मुळे तसेच कोणत्याही अधिकाऱ्या करवी चर्चा न केले मुळे कामात कर्तव्यच्युती केल्या मुळे यांना कायम निलंबित करावे अशी मागणी कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतिने अशोकराव जाधव यानी केली आहे. या बाबत सदर पत्र राज्यपाल महाराष्ट्र आणि मुख्य सचिव महाराष्ट्र यांना पाठवून कायम निलंबित करावे अशी मागणी स्वःहा अशोकराव जाधव यानी या पत्रापर सही करून केली आहे .
जी




