
जिद्द – जागर स्त्री शक्तीचा: डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
पाली (रत्नागिरी):*
स्त्री-पुरुष समानता ही काळाची गरज असून महिलांच्या अंगी असलेल्या जिद्द आणि कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचालित, डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, पाली येथे मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी ‘जिद्द – जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व विषय
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री. तुषार जाधव सर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, रत्नागिरी) आणि माननीय दीपिका सवाई राम (पोलीस हवालदार, रत्नागिरी) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. याप्रसंगी निमंत्रित वक्त्यांनी खालील विषयांवर मोलाचे विचार मांडले:
डॉ. पद्मजा कांबळे मॅडम : यांनी ‘सुजाण पालकत्व, बदलती जीवनशैली व आजार’ या विषयावर पालकांशी संवाद साधत आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले.
ॲड. सुयोग कांबळे सर : यांनी ‘कायदा व सुव्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन करत महिला व बालकांशी संबंधित कायदेशीर बाबींची माहिती दिली.
आपल्या मनोगतात डॉ. पद्मजा कांबळे यांनी शाळेच्या आणि संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. पालकांसाठी अशा माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी शाळेबद्दल अभिमान व्यक्त केला.
विविध स्पर्धा व उपक्रम
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आणि पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते:
सांस्कृतिक कार्यक्रम: विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमाचे परीक्षण माननीय श्री. अमित कदम सर यांनी केले.
पाककला स्पर्धा: महिलांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेचे परीक्षण माननीय श्री. गिरीश शितप सर यांनी केले.
दोन्ही परीक्षकांनी आपल्या भाषणातून शाळेची शिस्त, नेटके नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार आणि नेटके सूत्रसंचालन सौ.श्रेया गोसावी मॅडम आणि सौ. स्नेहल भागवत मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
मुख्याध्यापिका माननीय सौ. नूतन कांबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र (अण्णा) सामंत आणि संचालिका मा. स्वरूपा सामंत यांच्या प्रेरणेतून पार पडलेल्या या कार्यक्रमाचे पालकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.




