
जयगड येथील सेवानिवृत्त वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती घालून २५ लाख रुपयांचा
जयगड येथील सेवानिवृत्त वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून २५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यानच्या काळात घडली. सुधाकर लक्ष्मण जाधव (६१, रा. जयगड, बौद्धवाडी रत्नागिरी) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सुधाकर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आम्ही नाशिक पोलीस कार्यालयामधून बोलत असून तुमचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे अशी भीती तक्रारदार यांना घातली. तसेच दोन कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रींग तुमच्या बँक खात्याद्वारे झाली आहे. त्यामुळे चौकशीसाठी हजर रहावे लागेल असे सांगितले.
www.konkantoday.com



