
जनतेच्या मागणीनुसार उड्डाणपूल कापसाळपर्यंत
जनतेच्या मागणीनुसार कापसाळ पर्यंत उड्डाणपूल होणार असून त्याचे डिझाईन तयार झाले आहे. लवकरच यासाठी निधी मिळणार असल्याचे आमदार नीलेश राणे यांनी रविवारी येथे आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात जाहीर केले.
भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांनी शहरातील राधाताई लाड सभागृहात आयोजित कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. राणे पुढे म्हणाले की चिपळूणने मला कायमच प्रेम दिले असून मला साथ दिली आहे. त्यामुळे येथील विकासासाठी मी कायम कटिबध्द आहे. सध्या महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम प्रांत कार्यालयापर्यंत होत आहे. मात्र हा पूल कापसाळ रेस्टहाऊसपर्यंत व्हावा अशी मागणी जनता कित्येक वर्षे करीत आहे. त्यामुळे मीही याचा पाठपुरावा करीत होतो. त्यामुळे आता केंद्राकडून पुढील डिझाईन तयार झाले असून लवकरच त्यासाठी निधी मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
www.konkantoday.com




