
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान खेड तालुक्यात शनिवारपासून प्रारंभ
रत्नागिरी, दि. 5 ):- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान खेड तालुक्यात 7 मार्च ते 15 मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात महसूल विषयक विविध सेवा व दाखले यांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सुधीर सोनावणे यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील 11 महसूल मंडळातील आयोजित शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
भोस्ते, तळे, धामणंद आणि धामणदिवी या मंडळामध्ये माहे मार्च 2026 मध्ये शिबीर होणार आहे. शनिवार 7 मार्च 2026 रोजी ज्ञानदिप महाविद्यालय बोरज, रविवार 8 मार्च 2026 रोजी हनुमान मंदिर सुकिवली, शनिवार 14 मार्च 2026 श्री महालिंग मंदिर धामणंद, रविवार 15 मार्च 2026 आंबडस हायस्कूल आंबडस.
कुळवंडी, शिर्शी, चिंचघर, भरणे या मंडळामध्ये माहे एप्रिल 2026 मध्ये शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी कुळवंडी हायस्कूल कुळवंडी, शनिवार 11 एप्रिल 2026 रोजी श्री धावजीबुवा मंदिर कोरेगाव, शुक्रवार 17 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दस्तुरी, शनिवार 18 एप्रिल 2026 रोजी श्रीदेवी काळकाई मंदिर सभागृह, भरणे.
खेड, आंबवली, लवेल या मंडळामध्ये माहे मे 2026 मध्ये अभियान होणार आहे. शुक्रवार 8 मे 2026 रोजी खेड नगरपरिषद हॉल खेड, शनिवार 9 मे 2026 जिल्हा परिषद शाळा आंबवली, शुक्रवार 15 मे 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय आवाशी.




