चिपळूण शहरात थकबाकीदारांवर पालिकेची कारवाई, दोन गाळे केले सील


चिपळूण नगरपालिकेकडून मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली असून शहरातील दोन गाळेधारकांच्या मालमत्ता जप्त करून गाळे सील करण्यात आले आहेत. कर वसुलीसाठी पालिकेने कठोर भूमिका घेतली असून थकबाकी न भरणार्‍यांवर पुढील काळातही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहेत.
चिपळूण नगरपालिकेचा यंदाचा मालमत्ता कर सुमारे १५ कोटी ८ लाख रुपये इतका अपेक्षित होता. त्यापैकी १५ मार्चपर्यंत १० कोटी ६१ लाख रुपये वसूल करण्यात आले असून एकूण वसुली ७०.३६ टक्के इतकी झाली आहे. पालिकेकडून यापूर्वी सर्व थकबाकीदारांना नोटीस पाठवून कर भरण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानंतर काहींनी थकबाकी भरली, मात्र अनेक जणांनी अद्याप कर न भरल्याचे आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या कर विभागाकडून सुरुवातीला ७ दिवसांची नोटीस देण्यात आली. तरीही काही जणांनी कर न भरल्याने सुमारे ३०० थकबाकीदारांना अंतिम २४ तासांची नोटीस देण्यात देण्याचे काम सुरू झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button