चिपळूण रेल्वे ट्रॅकवर मद्यपी व्यक्ती, ट्रेन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना


चिपळूण येथील वालोपे रेल्वे स्थानकात एक धोकादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेतील एक व्यक्ती अचानक रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे लाईन पार करण्याचा प्रयत्न करत असताना येणार्‍या गाडीसमोर उभा राहिला. मात्र ट्रेन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४.३० वा. सुमारास रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेस चिपळूण रेल्वे स्थानकात येत होती. त्याच वेळी एक मद्यपी व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर उतरून लाईन पार करण्याचा प्रयत्न करत होता.
नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे तो मद्यपी घाबरून ट्रॅकवरच उभा राहिला. दरम्यान अचानक ट्रेन जवळ येत असल्याचे लक्षात येताच स्थानक परिसरातील ही परिस्थिती लक्षात येताच मांडवी एक्स्प्रेसच्या चालकान तत्काळ प्रसंगावधान राखत एअर ब्रेकचा वापर करून ट्रेन थांबविली. त्यामुळे त्या मद्यपी व्यक्तीचे प्राण वाचले. तसेच वेळेत घेतलेल्या या निर्णयामुळे ट्रेनमधील हजारी प्रवाशांचाही संभाव्य धोका टळला. घटनेनंतर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तीला रेल्वे ट्रॅकवरून सुरक्षित बाहेर काढले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button