चिपळूण नगर परिषदेच्या कर थकबाकीदारांवर ४ दिवसात कारवाई


कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी चिपळूण नगर परिषदेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी पायर्याला चाके लावली आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसात सुमारे ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे. तरीही जे करदाते कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांना २४ तासात कर भरण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत तरीही त्यांनी न भरल्यास येत्या चार दिवसांपासून मालमत्ता सील करण्यासह नळकनेक्शन तोडण्याची धडक कारवाई सुरू केली जाणार आहे.
नगर परिषदेला यावर्षी मालमत्ता व पाणीपट्टी करातून थकीत व चालू वर्षाची मिळून १८ कोटी ८६ लाख रुपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत ११ कोटी वसुली करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button