
चिपळुणात होणार ११३ कि. मी. ची भुयारी गटारे, पालकमंत्र्यांकडून दिला जाणार निधी
चिपळूण शहरातील दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठी ११३ किलोमीटरची भुयारी गटार योजना मार्गी लावली जाणार आहे. यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी पालकमंत्री उदय सामंत देणार आहेत. नगर परिषदेला भरावा लागणारा १५ टक्के निधीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम देणार आहेत. यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पुढाकार घेतला असून हे काम जुन्या सर्व्हेनुसार होणार आहे. योजनेची माहिती घेण्यासाठी ७ एप्रिलला विशेष सभा होणार आहे. यामुळे शहरातील लाखो रुपयांची गटार कामे रद्द करण्यात आली आहेत. शहरातील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच उघड्यावरील गटारांमुळे काही भागात कायम दुर्गंधी असते.
www.konkantoday.com



