
चिपळुणात हापूसचा दर एका डझनला दोन हजार ते बावीसशे
चिपळूण शहर बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेला हापूसचा दर ग्राहकांच्या आवाक्या बाहेर आहे. विशेष म्हणजे बाजारपेठेतील काही ठराविक व्यावसायिकांकडेच हापूस विक्रीसाठी ठेवण्यात आला असून तो एका डझनला दोन हजार ते बावीस, तेवीसशे रुपये दरात विकला जात आहे. आवाक्याबाहेर असणार्या दरामुळे हापूस खरेदीकडे ग्राहकांनी पूर्णतहा पाठ फिरवली आहे. दरम्यान, आवक नुसार हापूसचा दर कमी अधिक होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. कोकणात फळाचा राजा म्हणून हापूस आंब्याची विशेष ओळख आहे असे असताना अनेक वर्षापासून बदलत्या वातावरणाशी हापूसला सामना करावा लागत असून परिणामी त्याची आवक घटते चालली आहे.
www.konkantoday.com




