घर बांधणे महागले ! युद्धामुळे लोखंडीसळ्या अन् सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ

रत्नागिरी
मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले असून या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले . या हल्ल्याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ यामुळे जगभरात क्रूड ऑईल आणि गॅसचा तुटवडा जाणवला. तर अनेक देशांमध्ये महागाई वाढली आहे. या युद्धामुळे घर बांधणेही महागले आहे.

घरबांधणीच्या खर्चात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सळईच्या किमतीत काही दिवसापूर्वी घट झाली होती. आता सळईच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यात अनेक शहरांमध्ये सळईच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे.

गेल्या काही महिन्यांत सळईच्या किमतीत लक्षणीय घट झाली होती, पण मार्च महिन्यात त्यात सातत्याने वाढ झाली आहे. सळई हे घराच्या मजबुतीसाठी एक महत्त्वाचे बांधकाम साहित्य असले तरी, त्याच्या किमतीतील चढ-उतारांचा थेट परिणाम बांधकाम खर्चावरही होतो. त्याच्या किमतीत घट झाल्याने घर बांधणीचा खर्च कमी होतो, तर सळईच्या किमतीत वाढ झाल्याने बांधकाम खर्च वाढतो.

मध्य पूर्वेतील युद्धामुळे तेल आणि वायूचा तुटवडा तसेच पुरवठा साखळीतील व्यत्ययांचा परिणाम या क्षेत्रावर जाणवत आहे. घरबांधणीमध्ये वापरले जाणारे पोलाद आणि सिमेंट हे दोन्ही ऊर्जा-केंद्रित क्षेत्र आहेत आणि कोणत्याही व्यत्ययामुळे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. ९ फेब्रुवारीच्या तुलनेत, सध्याच्या लोखंडाच्या दरात प्रति मेट्रिक टन ४,००० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button