गोरक्षकांनी थरारक पाठलाग करत नेरके येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला

राजापूर : गोरक्षकांनी थरारक पाठलाग करत नेरके येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला असून याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

सोलगाव परिसरातून अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षक गो-तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. सोमवारी दुपारी सोलगाव मार्गावरून गुरे वाहतूक करणारा टेम्पो येत असल्याची खबर मिळताच गोरक्षकांनी टेम्पोचा पाठलाग करत नेरके येथे ही गाडी अडविली. टेम्पोमध्ये तीन जनावरे आढळून आली. राजापूर पोलिसांना याबाबतची खबर देण्यात आली. राजापूर पोलिसांनी घटनास्थळी
जात टेम्पोसह चालक चंद्रकांत कुर्ले याला ताब्यात घेतले आहे. गोरक्षकांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button