
गावडे आंबेरे हनुमानवाडी येथे १ एप्रिलपासून श्री हनुमान मंदिरात जन्मोत्सव कार्यक्रम
रत्नागिरी : तालुक्यातील गावडे आंबेरे येथील हनुमान मंदिरात श्री. हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे १ ते ४ एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
१ एप्रिल रोजी ५० हजार रुपये प्रथम पारितोषिक असलेली अंडरआर्म क्रिकेट लीग व शालेय मुलांच्या स्पर्धा (पंचक्रोशी मर्या.), २ एप्रिल रोजी सकाळी श्री हनुमानाचा जन्मसोहळा, मिरवणूक व रात्री १० वाजता नृत्यसंगम हा डान्स शो होणार आहे.
३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता क्रिकेट सामने, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू, रात्री १० वाजता समर्थकृपा प्रॉडक्शन निर्मित कोकणचा साज संगमेश्वरी बाज हे संगमेश्वरी बोली भाषेतील तुफान विनोदी लोकनाट्य सादर होणार आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, रात्री ११ वाजता ले. वसंत कानेटकर लिखित एक ह्रदयस्पर्शी, कौटुंबिक नाटक – प्रिय आईस… समारोप हे नाटक होणार आहे.
सर्व भाविकांनी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




