गणित प्रावीण्य परीक्षेत फाटक हायस्कूलचे यश

रत्नागिरी : प्रतिनिधी

गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये
फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. इयत्ता पाचवीमधील पाच विद्यार्थ्यांनी व आठवीमधील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. हे विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
पाचवीतील वरद गावखडकर, मानस सुर्वे, रुद्र सरदेसाई, अर्नेश कदम, आरोही ढाणे यांनी यश मिळवले. आठवीमधील मुक्ता बापट, गौराई महाकाळ, राजमुद्रा मोंडकर यांनी यश मिळवले.
या विद्यार्थ्यांना श्रावणी जोशी व प्रीति हातिसकर यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक राजन कीर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button